तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर आशिष लोकरे लिपिक दत्तात्रय साळुंखे आणि लिपिक पी.पी.बरुरकर यांच्यावर कारवाई होईपर्यंत लहुजी शक्ती सेना राज्यभर आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी तुळजापुरात निघालेल्या मोर्चा मधून दिला.

हा मोर्चा मोठ्या संख्येने घोषणाबाजी करीत नगरपरिषदेच्या आणि पोलिस कार्यालयाच्या समोर आल्यानंतर मोर्चे करांना तेथे अडवण्यात आले मोठा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्यामुळे व व्यासपीठ परवानगी नाकारल्यामुळे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली.

 प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी लोकरे यांनी पैशाची देवाणघेवाण करून मनमानीपणे नियुक्त्या करणे आणि मातंग तरुणांना त्रास देण्याचे काम केले आहे त्यामुळे आणि समाजाच्या तरुणांना न्याय देण्यासाठी विशेषतः अनुकंप यादीत असणाऱ्या 17 तरुणांना तात्काळ नोकरीत सामावून घेण्यासाठी सदर मोर्चा काढला असल्याचे सांगून लहुजी शक्ती सेना आणि प्रदेशाध्यक्ष यांना बदनाम करण्यासाठी चुकीची आणि खोटी तक्रार करणाऱ्या दत्तात्रेय साळुंखे आणि प्रफुल्लता बरूरकर यांच्यावर प्रशासनाची फसवाफसवी केल्याप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करून लहुजी शक्ती सेना ची माफी मागण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. अत्यंत आक्रमक पद्धतीने सोमनाथ कांबळे यांनी नगरपरिषदेच्या कारभाराचा याप्रसंगी समाचार घेतला अनेक चुकीच्या कामाचा आढावा त्यांनी सभेमध्ये वाचून दाखवला.

लहुजी शक्ती सेना चे संस्थापक विष्णू कसबे यांनी याप्रसंगी हुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे 17 तरुणांना न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त करून हा प्रश्न मोर्चाने सुटला नसेल तर त्याला न्यायालयात जाऊन दातांना मागावी लागेल आणि लहुजी शक्ती सेना निश्चितपणे लोकशाही आणि न्यायालयाच्या माध्यमातून तरुणांना न्याय देईल असा विश्वास बोलून दाखवला

सदरील मोर्चाची सुरुवात शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक,गोराई चौक,जूने बस स्थानक,लातूर चौक,डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून नगर परिषद समोर येवून विराट मार्चा स्तिरावून अनेकांनी आपल्या भाषणातून नगर परिषदच्या भोंगळ कारभारावर व सोमनाथ कांबळे व लहुजी शक्ती सेना संघटनेवर मुख्याधिकारी यानीं बदनामी केलेल्या वक्तव्यावर कडाडून निषेध केला.

 यावेळी लहुजी शक्ती सेना संस्थापक विष्णू भाऊ कसबे,प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे,जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, लक्ष्मण क्षीरसागर, कोयर कमिटीने कैलास दादा अर्जूने,दयानंद कांबळे,हेमंत भाऊ,दत्ता गंड,सोलापुरचे सुधाकर पाटूळे,अभिषेक देवरकर,बालाजी भाऊ गायकवाड, जालण्याचे संतोष तुपसुंदरे,जेष्ठ नेते बजीरंग ताटे,विजय जाधव,बुलढाण्याचे कैलास खंदारे,राज्य कोअर कमिटीचे संतोष आहिरे व लातूरच्या मायाताई लोंढे आदींची आवेशपूर्ण भाषणे झाली. त्यानंतर लहुजी शक्ती सेनेने मागण्याचे निवेदन पोलीस स्टेशन व नगर परिषद यांचेकडे सादर केले.सकाळपासून लहुजी शक्ती सेनेचे हजारो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजापूर शहरात जमा झाले होते.

मोर्चा सभेत लक्ष्मण गायकवाड यानीं सुत्रसंचलन तर प्रास्ताविक शिवाजी गायकवाड यानीं केले.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे हजारो सैनिक व समाज बांधव आणि महिला उपस्थीत होते.

 
Top