तुळजापूर : सतीश महामुनी
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी आपण नव्याने तज्ञ आरेखाकाकडून नेत्रदीपक आणि सुंदर तुळजापूर विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असून तुळजापूर शहराच्या विकासासाठी ज्या नागरिकांना आपल्या सूचना द्यायचे आहेत त्यांनी ई-मेलद्वारे सूचना देण्याचे आवाहन तुळजापूरचे आमदार आणि तुळजाभवानी देवस्थान संस्थान विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास या विषयावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवक नेते आनंद कंदले, माजी जिप सदस्य गणेश सोनटक्के, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, उद्योजक रतिकांत भोसले यांची उपस्थिती होती. तुळजाभवानीचे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना दोन दिवस मुक्काम करण्यासाठी तसेच दर्शना बरोबर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ही योजना करीत असल्याचे आमदार पाटील यांनी प्रारंभी स्पष्ट केले.
जगभरामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वाचे ठरलेले आहेत त्याप्रमाणे तुळजाभवानीच्या देवस्थान परिसरातील पाच किलोमीटर वर्तुळात विकासाच्या योजना राबविण्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना ई-मेलद्वारे देण्याचे आवाहन करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी यांच्या इतिहासाला समोर ठेवून प्रेक्षणीय अशी प्रदर्शनी आणि शिवसृष्टी करण्याचा मनोदय आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या पर्यटन आणि इतर खात्याकडून तुळजापूर तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा अत्यंत तज्ञ रचनाकाराकडून करण्याचा प्रयत्न आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे पुरातत्व विभाग आणि स्थानिक संस्था यांना सोबत घेऊन नव्याने डीपीआर करण्यात आला आहे त्याच धर्तीवर तुळजापूरचा नवीन डीपी तयार करण्याचा हा प्रयत्न असून अद्यावत नाट्यग्रह क्रीडासंकुल बगीच्या यासह शहरामध्ये फिरण्यासाठी आवश्यक प्रेक्षणीय ठिकाणे नव्याने बसवण्याचा प्रयत्न या योजनेत आहे कृषी क्षेत्राला सोबत घेऊन एग्रीकल्चर टुरिझम करता येईल का या संदर्भात देखील सूचना मागवून घेत आहोत असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले ा प्रयत्नांमधून तुळजापूर मध्ये येणार्या भाविक भक्तांना आणि शहरवासीयांना उत्तम आणि सुंदर शहराचा अनुभव देण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे.
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत या बाबी करण्यासाठी आपले प्रयत्न असून आपण यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या संदर्भात विनंती करणार आहोत यापूर्वी प्राधिकरणा मधून करण्यात आलेली कामे पूर्ववत चालू राहतील परंतु शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याचे सामर्थ्य या नवीन विकास आराखडा मध्ये असेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
तुळजापूर तीर्थक्षेत्राला जोडणारी रेल्वे लवकरात लवकर करण्यासाठी राज्य सरकारने आपला वाटा उचलावा आणि केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार पूर्ण करावा अशी मागणी याप्रसंगी आमदार पाटील यांनी केली तुळजापूर - उस्मानाबाद - सोलापूर या रेल्वे मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे आजच्या स्थितीला हे काम कोणत्या स्थितीत असून त्याची प्रगती करण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले नगर-बीड-परळी मार्गाला ज्याप्रमाणे तातडीने निधी दिला व राज्य सरकारने प्रयत्न केले त्यानंतर वर्धा व नांदेड या मार्गासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे त्याचप्रमाणे तुळजापूर उस्मानाबाद सोलापूर मार्गासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची मागणी या निमित्ताने केली आहे.
पत्रकारांनी आमदार पाटील यांना विकासातील उणिवा दाखवून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की या सर्व बाजू बाजूला ठेवून नव्याने अत्यंत देखणा आराखडा करण्याकडे आपला कटाक्ष आहे तो पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
सदर पत्रकार परिषदेमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाविक भक्तांना तुळजापूर शहरात आल्यानंतर संडास बाथरूम मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होत असल्याची बाब मान्य करून शहराचा अपुरा विकास झाल्याचा ठपका ठेवला आहे.