नळदुर्ग , दि.२९ : अणदुर ता.तुळजापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर तिघानी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गावातीलच सागर घोडके, मुकेश भोरे आनंद घोडके या तिघानी पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपी राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. आरोपीनी जबरदस्तीने तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरीने घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या संतापजनक घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा नराधमास अटक केली आहे. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपीं पैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे.
याप्रकरणी साहय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे पुढील तपास करीत आहेत.