लोहगाव,दि. २९ , निजाम शेख

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे  श्री.संत ज्ञानेश्वरी पारायण, अंखड हरिनाम सप्ताह सोहळ्यास आज रविवार (दि.३१)रोजी प्रारंभ होत आहे.

सप्ताह सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, प्रवचन,किर्तन,भजन, हरीपाठ,
काकडा आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम  होणार आहेत.

 सोमवार (दि.३१)रोजी हभप श्री.प्रल्हाद सरडे महाराज(नांदुरी), हभप संजय पवार महाराज(शाहपूर,
सोमवार(दि.०१) हभप महेश महाराज (माकणी),हभप बलभिम बागल महाराज(चिकुंद्रा), मंगळवार (दि०२) 
तुकाराम हजारे महाराज (बेळगाव),
हभप दयानंद राजमाने महाराज (होर्टी),बुधवार( दि.०३)नितीन जगताप  महाराज(‌क.हिप्परगा),
हभप ज्ञानेश्वर महाराज (उमरगा)
गुरूवार (दि.०४) हभप तुकाराम पवार महाराज (धारवड), हभप राजू पाटिल महाराज(वागदरी), शुक्रवार (दि.०५) हभप गुरूवर्य विठ्ठल वासकर महाराज(वाशी).हभप  अशोक गर्जे महाराज (माळेगाव)
  यांचे किर्तन व प्रवचन पार पडणार आहेत. तर शनिवार(दि.०६)रोजी 
सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक व नगर प्रदक्षणा त्यानंतर ११ वाजता हभप राम गायकवाड महाराज(चिकुंद्रा)व हभप तुळशिराम मुळे महाराज यांच्या काल्याचे किर्तन व नंतर  भाविकांना महाप्रसादाचे  वाटप करून सप्ताहची सांगता होणार आहे.

 तरी लोहगावसह परीसरातील पंचक्रोशीत भावी भक्तांना लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top