काटी, दि.२६ : उमाजी गायकवाड तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवार दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता येथील बसस्थानक शेजारी शिवजयंती निमित्त व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नाही. परंतु राज्यातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने येथील संतोष(दादा) बोबडे मित्र परिवार व शिवजन्मोत्सव तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top