काटी, दि.२६:  
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती उमेद अभियान अंतर्गत बॅंकेचे शाखाधिकारी अभिषेक कुमार यांच्या हस्ते  बारा महिला बचत गटांना एक टक्का या नाममात्र व्याज दराने प्रत्येकी एक व दोन लाख रुपये असे एकूण 19 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. 

 महिला बचत गटांचे चार प्रस्ताव तयार आहेत. या मध्ये प्रामुख्याने जय संतोषी माता महिला बचत एक लाख, उपासणा महिला बचत गट एक लाख, करण अर्जून महिला बचत गट दोन लाख, श्री समर्थ महिला बचत गट दोन लाख या बचत गटांना बुधवार दि.24 रोजी कर्जाचे वितरण करण्यात आले. तर यापुर्वी शिवशंभो, श्रीराम, सावित्रीबाई फुले, श्री गणेश, परी, श्रेया या महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख कर्जाचे वितरण करण्यात आले. तर आणखी चार महिला बचत गटांचे प्रस्ताव तयार असल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. 

लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. बचतगट चालविणाऱ्या महिलांनाही त्याचा फटका बसला आहे. सध्या कोरोनामुळे उद्योगधंदे बंद असल्याने ग्रामीण भागातील महिला मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिला महिला या घरेलू क्षेत्रात काम करतात आणि रोजच्या कमाईवर अवलंबून असतात. याचा सकारात्मक विचार करून बॅंकेचे शाखाधिकारी अभिषेक कुमार यांनी महिला बचत गटांना प्राधान्यांने कर्ज पुरवठा केला. त्यामुळे बचत गटातील अनेक महिलांना याचा फायदा होत असून महिला मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 यावेळी शाखाधिकारी अभिषेक कुमार, बॅंक कर्मचारी मेधा धारिया, भोसले, बनसोडे, बी.एम.शेरखाने, नामदेव तांबटकरी, नवीन शिंदे,राम मस्के यांच्यासह महिला बचत गटातील संजीवनी हजारे, अनिता म्हेत्रे, शबाना शेख, शैला भाळे,वंदना घोटकर, शबाना जमादार, उज्वला जगताप आदी महिला उपस्थित होत्या.
 
Top