इटकळ ,दि.२५ :
नुकतेच पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उज्वल यश संपादन केलेले अणदूर ता.तुळजापूर येथील महेश घोडके व केशेगाव येथील भारतीय सेनेतील दोन जवानांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

अगदी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत केवळ जिद्दीच्या बळावर अणदूर येथील महेश धनराज घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.व सध्या महेश धनराज घोडके हे  नागपुर येथे पोलीस दलात सेवा बजावत आहेत. त्यांनी हे उज्वल यश संपादन केल्या बद्दल पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके व केशेगाव येथील भारतीय सेनेतून 21 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले मेजर भालचंद्र कोळी , रामचंद्र साखरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नितिन जळकोटे व संजय शिवकर मुरलीधर शिंनगारे यांनी  शाल ,श्रीफळ ,पुष्प गुच्छ व फेटा बांधुन सत्कार केला.


यावेळी भिमाशंकर घंटे,संगमेश्वर जळकोटे,नागनाथ जळकोटे,चन्नापा साखरे,परमेश्वर हन्नुरे ,दिनेश सलगरे,नामदेव गायकवाड ची प्रमुख  उपस्थिती  होती.
 
Top