वागदरी, दि. २५ :
बोरगाव (तु.) ता.तुळजापूर येथील मुळ रहिवासी असल़ेले आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते आरवींद गायकवाड यांची कन्या आरती आरविंद गायकवाड यांची आखिल भारतीय ओबीसी महासंघ युवती विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आखिल भारतीय ओबीसी महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे नुकतेच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश हिवारकर,विनोद भामरे, राष्ट्रीय सचिव गजानन मिरजे,राष्ट्रीय सरचिटणीस कुमार कुंभार,राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख गणेश नकाते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गौरव पाटील, राज्य सरचिटणीस विक्रम विजापूरे, मराठवाडा विभाग अध्यक्ष राजेश भांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्या या निवडी बद्दल सामाजिक कार्यकर्ते आर.एस.गायकवाड, मारुती बनसोडे, शिवाप्पा जवळगे ,सुनील बनसोडे, अरुण लोखंडे, एस.के.गायकवाड, डॉ. क्रांती गायकवाड, सहशिक्षिका आरती गायकवाड, प्रिती गायकवाड आदीनी आभिनंदन केले आहे.