तुळजापूर , दि.२५ : शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तथा कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात हा वाढदिवस विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
नळदुर्ग शहरातील इंदिरानगर येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळेमधील एक अनाथ मुलीचा दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च उचलत तिचे युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी पालकत्व घेतले आहे. या वेळेस त्यांनी प्राथमिक स्वरूपात एक हजार रुपयाचा धनादेश गडदे वैष्णवी रेशीम या मुलीकडे सुपूर्द केला.
शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, अमर भाळे यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. तसेच यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या मुलीची शैक्षणिक गुणवत्ताही इतर कोणत्याही कारणास्तव दबली जाऊ नये, यासाठी केलेला हा आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर घोडके, मुख्याध्यापक संजय घंटे , भुजबळ शेख , अंगणवाडीसेविका सांगवीकर म्हेत्रे , युवा सेनेचे माजी शहरप्रमुख अफजल कुरेशी, लक्ष्मीकांत घोडके, आकाश घोडके, राहुल घोडके, रामेश्वर घोडके, अजय पवार, किरण दुस्सा, रोहित माने, शशिकांत जाधव, शमशोद्दीन शेख यांच्यासह नळदुर्ग शहरातील शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.