नंदगाव, दि.२५:शाम नागीले
 महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटना गेल्या चार दिवसापासून मुबंईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करत असून ते  आंदोलन हाणून पाडण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप केला जात  आहे.

   राज्य संगणक परीचालक संघटना गेली 10 वर्षापासून संग्राम प्रकल्प ,आपले सरकार सेवा केंद्र मध्ये काम करत असून यामध्ये टोटल 22000 संगणक परिचालक आज काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतील संगणक परिचालक यांना आयटी महामंडळा कडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन द्यावे या मागणीसाठी आझाद मैदानात गेली चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत संगणक परिचालक संघटनेमुळे आज महाराष्ट्र सरकारला तीन वेळेस प्रथम पारितोषक मिळाले असून हे फक्त महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेमुळे महाराष्ट्र सरकार प्रथम क्रमांक मिळाला असून अशा संगणक परिचालकांना आजही सरकार आश्वासन व वचन देऊन सुद्धा त्या आश्वासनाची पूर्तता  करत  नाही.  यामुळे आज महागाई ,बेरोजगारी वाढत आहे.

 या महागाईच्या काळामध्ये 6 हजार एवढ्या वेतनावर काम करत असून 
शासन ,प्रशासन व ग्रामीण जनतेचा दुवा असलेला संगणक परिचालक यांना महाराष्ट्र सरकारने आयटी महामंडळात कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन द्यावे, या मागणीसाठी आज चौथ्या दिवशीही आझाद मैदानावर आंदोलन करीत असून येथे आंदोलन हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पोलिसांना पुढे करून हे आंदोलन मिटवण्याचे व संपविण्याचा कट कारस्थान करत असल्याचा आरोप संगणक परिचालकातुन होत आहे.


 
Top