अचलेर ,दि.१९: जय गायकवाड
रयतेचे राजे,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तुळजापूर तालुक्यातील कुन्सावळी येथे सरपंच कविता गायकवाड यांच्या हस्ते पूजन करून राजाच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवबा प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामस्वछता करण्यात आली.
यावेळी उपसरपंच रुपाली अर्जुन शिंदे, शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिद्र गुंड ,उपाध्यक्ष नितीन शिंदे, प्रगतशील शेतकरी कल्याणी गायकवाड , कार्यकर्ते गोरख शिंदे,शंकर शिंदे,समर्थ शिंदे,विलास शिंदे,आकाश माळकुंजे, बसवंता वाघमोडे,धोंडीबा कोकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.