उस्मानाबाद,दि.१९:
कै पवनराजे उर्फ भुपालसिंह संताजीराव राजेनिंबाळकर यांच्या जयंती निमित्त यांच्या राजकीय जीवन प्रवासा निमित्त "जनतेचे राजे पवनराजे"या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला .
या प्रसंगी नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष , उस्मानाबाद कळंब मतदार संघआमदार कैलास घाडगे पाटील, प्रमुख पाहुणे पञकार राजा माने , पोर्णिमा गादिया समाज सेविका तथा संस्थापक दिशा संस्था पुणे, मकरंद राजेनिंबाळकर नगराध्यक्ष उस्मानाबाद, माजी नगराध्यक्ष कळंबचे पांडुरंग कुभार ,संपादक तथा लेखक गणेश तुकाराम शिंदे यांच्यासह नगरसेवक,जिप सदस्य तथा प स सदस्य व राजे साहेबांचे जुने सहकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती