काटी,दि.१९: उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार  रोजी सकाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

प्रारंभी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


 यावेळी सरपंच आदेश कोळी, अतुल सराफ, माजी सैनिक श्रीकांत गाटे, प्रदीप साळुंके, जितेंद्र गुंड, सुहास साळुंके, भैरी काळे,ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, अविनाश वाडकर, शिवलिंग घाणे, नानासाहेब आगलावे, संजय महापुरे, दत्ता गाटे, बाळासाहेब मासाळ, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले, बळीराम सपकाळ, अनिल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top