वागदरी,दि.१९:एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आभिवादन करण्यात आले.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रामसेवक जी.आर.जमादर यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेव बिराजदार, बकुलाबाई भोसले, विद्या बिराजदार ,कमलबाई धुमाळ, रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, पत्रकार किशोर धुमाळ, शशिकांत बिराजदार, जयवंत यादव,प्रेमनाथ माडजे,सर्जेराव चव्हाण, ओंकार चव्हाण सह ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचबरोबर येथिल जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई चिनगुंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्ताने येथील शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी सहशिक्षक तानाजी लोहार, सहशिक्षिका आरती साखरे, एम.आर.चौधरी, सुष्मा सांगळे, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनबाई पवार, मदतनीस रुपाली जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवाप्पा जवळगे, प्रेमनाथ माडजे पत्रकार किशोर धुमाळ, एस.के.गायकवाड आदीसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.