नळदुर्ग, दि. 20 :
उस्मानाबाद येथे पार पडलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेत नळदुर्ग येथिल अध्यापक विद्यालयाने यश मिळविल्याने विजेत्या विदयार्थी व प्राध्यापक यांचे सर्वत्र आभिनंद केले जात आहेत.
श्री.स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त उस्मानाबाद येथिल रामकृष्ण परमहंस महाविदयालयात निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आले. त्यामध्ये नळदुर्ग अध्यापक विदयालयाची विदयार्थीनी कु.स्नेहा शंकर पाटील हिने निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविले तर शिक्षकांच्या वक्तृत्व स्पर्धेत प्राध्यापक जमखंडे यांनी व्दितीय क्रमांक मिळविले आहे.
या यशाबद्दल प्राचार्य अकुंशराव एस.के, प्रा. पवार एम.बी, प्रा.कोलतमे पी.एच,प्रा.झाल्टे यू.पी, प्रा. श्रीमती निर्मळे व्ही.एल, प्रा.श्रीमती पुराणिक डी .डी आदीसह प्राशिक्षणार्थी विदयार्थी व नागरिकातुन आभिनंदन करण्यात येत आहे.