काञी,दि.२०:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 जयंतीनिमित्त काञी ता.तुळजापूर येथिल स्वराज्य ग्रुप च्यावतीने रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 30 दात्यानी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व रक्तदात्याना प्रमाणपञ, पुष्पहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रोहन देशमुख, अविनाश कापसे, प्रदीप देशमुख, सुहास बागल ,अमित देशमुख' 'सचिन देशमुख, बालाजी शिंदे ,नरसिंग देशमुख, प्रमोद शिंदे , सचिन शेळके, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक , सर्व शिवभक्त नागरिक उपस्थित होते.