वागदरी,दि.२० : एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथिल अॕड. अमोल राजकुमार पाटील यांची उस्मानाबाद राष्ट्रवादीच्या माहिती तंञज्ञान विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबाद्दल पाटील यांचे आभिनंदन होत आहे.
अमोल पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. पक्षहीत जोपासत गावच्या विकास कामात सहभागी होतात.शिव बसव राणा जन्मोत्सव समीती वागदरीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गेल्या सात ते आठ वर्षांपासून शिव सप्ताहाचे आयोजन करीत आहेत. त्याचबरोबर समाजोपयोगी उपक्रम राबवित असुन रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, व्याख्याने, महिलासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजनही ते त्यांच्या सहकार्यासमवेत करतात. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण विभाग उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश अध्यक्ष सारंग श्रीनिवास , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रदेश उपाध्यक्ष मतीन जहिरोद्दीन इनामदार यांनी नुकतेच सदर निवडीचे पत्र अमोल पाटील याना दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल शिव बसव राणा जन्मोत्सव समीतीचे प्रमोद बिराजदार, भरतसिंग ठाकूर आदीसह मित्रपरिवारानी आभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.