अणदूर,दि.८: 
 बहुचर्चित  अणदुर ता.तुळजापूर येथिल  ग्रामपंचायतच्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे रामचंद्र आलुरे यांची तर उपसरपंचपदी डॉ. नागनाथ कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीनंतर माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी व मधुकरराव चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

  तुळजापूर तालुक्यातील अणदुर ग्रा.पं. मध्ये महाविकास आघाडीने १७ पैकी १६ जिंकत ग्रामपंचायतवर  निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया सोमवारी  ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली.विस्तार अधिकारी कोंडीबा भांगे, ग्रामविकास अधिकारी देवीदास चव्हाण, प्रशासक ए.आर.खान व तलाठी विलास कोल्हे, पोलीस पाटील जावेद शेख यांनी निवड प्रक्रिया पार पाडली.दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने रामचंद्र आलुरे व डॉ. नागनाथ कुंभार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी सरिता मोकाशे, अनुसया कांबळे,देवकी चौधरी, गोदावरी गुड्ड,उज्वला बंदपट्टे, स्नेहा मुळे,जयश्री व्हटकर,अनिता घुगरे, मितनबी इनामदार,बाळकृष्ण घोडके, डॉ. जितेंद्र कानडे, धनराज मुळे,बालाजी घुगे,डॉ. विवेक बिराजदार,गणेश सुर्यवंशी हे सदस्य उपस्थित होते. 

निवडीनंतर  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन पेढे भरवून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


 
Top