वागदरी, दि.८: एस.के.गायकवाड
शहापूर ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायत सरपंचपदी उमेश भगवान गोरे यांची तर उपसरपंच पदी प्रदीप पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शहापूर ग्रा.प.चे सरपंच पद हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. येथील नुकतेच झालेल्या ग्रा. प.च्या सार्वत्रिक निवडणूकीत नृसिंह ग्रामविकास पँनलचे ओबीसी प्रवर्गातील उमेश गोरे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.
सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी येथे सरपंच व उपसरपंच पदासाठीची निवडणूक झाली. या निवडणुकीत सरपंच पदाकरिता उमेश गोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता तर उपसरपंच पदाकरिता प्रदीप काळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच पदासाठी उमेश गोरे यांची निवड घोषित करण्यात आली. तर उपसरपंच पदासाठी प्रदीप काळे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक आधिकारी म्हणून मंडळ आधिकारी (महसूल) जळकोटचे भोकरे पी.एस.यांनी काम पहिले.तर ग्रासेवक एम.सी.निलगार यांनी प्रोसिडिंगचे काम पाहिले. यावेळी तलाठी जमादर पी.एन.व गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी नूतन सरपंच,उपसरपंच व ग्रा.प.सदस्यांचा ग्रामस्थानी फेटा बांधून यथोचित सत्कार करून आभिनंदन केले.