तुळजापूर, दि.८: 
तुळजापूर  तालुक्यातील आरळी बुद्रुक   ग्रामपंचायत सरपंचपदी गोविंद पारवे तर उपसरपंचपदी किरण व्हरकट यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.सदरील निवडी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी एस.एम.लोमटे, ग्रामसेवक हमीद पठाण,तलाठी माने यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.


यावेळी सरपंच गोविंद रंगनाथ पारवे व  उपसरपंच किरण शामराव व्हरकट यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य  संजय नागनाथ पाटील, भीमराव अर्जुन सोनवणे, सौ. मधुमालती दादाराव पारवे, सौ. अश्विनी जनार्दन व्हरकट, सौ. ज्योती राहुल पौळ, सौ. मनीषा सिद्राम तानवडे, सौ.नशिबा फारुक शेख आदी सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आरळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने सर्वांना आगामी पाच वर्षांच्या कार्यकालासाठी  शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मोठया प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
 
Top