तुळजापूर, दि. ८ :
श्री तुळजाभवानी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार पुजारी बांधवांसाठी अखेर सुरू करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात सदर मार्ग बंद करण्यात आला होता. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर हा दरवाजा पुजारी वर्गाच्या रहदारीसाठी खुला करण्यात आला .
आमदार राणाजगजितसिंह पाटील ,नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे , अविनाश गंगणे ,श्रीनाथ शिंदे,औदुंबर कदम या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुजारी बांधवांची तपासणी आणि मंदिर संस्थानच्या नियमानुसार सदर मार्ग पुजारी बांधवासाठी खुला करण्यात आला.
पुजारी बांधव व मंदीर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर मार्ग बंद असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या यासंदर्भात नगराध्यक्ष सचिन रोचकरी प्रक्रिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार पाटील यांच्याकडे यासंदर्भात मागील दहा दिवसापासून पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळून सदर छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार पुजारी वर्गासाठी पूर्वीप्रमाणे खुले झाले आहे.