तुळजापूर,दि.८:डाँ.सतीश महामुनी

शहरातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नगर परिषदेला आपल्या आमदार निधीतुन अद्यावत रुग्णवाहिका दिली असून त्याचा लोकार्पण सोहळा नगर परिषदेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या आमदार निधीमधुन नगर परिषद तुळजापूर यास रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नगरपरिषद प्रांगणात संपन्न झाला. नगरपरिषदेच्या वतीने आमदार पाटील यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

आमदार राणा जगजीत सिंह पाटील , नगराध्यक्ष  रोचकरी,युवा नेते विनोद  गंगणे, नगरसेवक पंडीत जगदाळे, विजय कंदले, अविनाश गंगणे,विशाल रोचकरी,माऊली भोसले,अभिजीत कदम,विनोद पलंगे,किशोर साठे, औदुंबर कदम,अंबरीश जाधव, शिवाजी बोधले,गुलचंद व्यवहारे, इंद्रजीत साळुंके,सुहास साळुंके, श्रीनाथ शिंदे, रत्नदिप भोसले,नागेश नाईक,विक्रम देशमुख, आनंद कंदले,  मुख्याधिकारी लोकरे नगर परिषदचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

या निमित्ताने तुळजापूरची नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा शाल फेटा बांधून सत्कार केला आणि ऋणनिर्देश व्यक्त केले. तुळजापूर शहरामध्ये बाहेर जाऊन येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे यामध्ये अद्यावत आणि तंत्रज्ञानाने युक्त आशा रुग्णवाहिकेची गरज होती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दूरदृष्टीने शहरातील भाविकांनी शहरवासीय यांच्या उपयोगासाठी ही रुग्णवाहिका दिलेली असून दोन नगरसेवक यांच्या मोबाईल क्रमांकावर तिचा उपयोग आगामी काळात केला जाणार आहे याशिवाय रुग्णवाहिका उपयोगासाठी स्वतंत्र टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
 
Top