इटकळ, दि. ८
तुळजापूर तालुक्यातील इटकळच्या सरपंचपदी राजश्री राहुल बागडे व उपसरपंच पदी फिरोज नजिर मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर अमोल दैलतराव पाटील, सविता महादेव सोनटक्के,पद्माबाई काशिनाथ लकडे, रंजना श्रीकृष्ण मुळे, खातुनबी बाबु मकानदार, साहेबराव अमृता क्षीरसागर,नजिर यासिन शेख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणुन आर. ओ. पिंपळकर यानी काम पाहिले यावेळी ग्रामसेवक तांबोळी उपस्थित होते. पॕनेल प्रमुख अरविंद पाटील,अनिल भोपळे, चंद्रकांत लोहार,श्रीकृष्ण मुळे यांच्यासह कार्यकर्ते यांनी पेढे भरवुन फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.