तुळजापूर,  दि . ८ :

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या कोचिंग क्लास संचालकांच्या राज्यव्यापी संघटनेची तुळजापूर तालुका कार्यकारिणी राज्य कोअर कमिटी सदस्य डॉ.आनंद मुळे व नूतन जिल्हाध्यक्ष  वैजिनाथ मिटकरी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. 


या कार्यकारिणीत तुळजापूर तालुका अध्यक्षपदी राम माने, उपाध्यक्षपदी राहुल बोबडे, सचिवपदी उमाजी सरवदे, ग्रामीण विभाग प्रमुख म्हणून संजय सुरवसे तर ग्रामीण सचिवपदी अतुल पवार यांची निवड करण्यात आली. शहरातील जेष्ठ कोचिंग क्लास संचालक आण्णासाहेब मात्रे यांची मुख्य सल्लागार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. 

यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष वैजिनाथ मिटकरी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रताप मोरे, अँड. सदानंद आलुरकर, जीवन वाकळे, शिवदर्शन उकरंडे, विकास जाधव, परमेश्वर ढेकरे उपस्थित होते.
 
Top