तुळजापुर, दि. २६ :

स्वा. सावरकर  यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त सावरकर विचारमंच तुळजापूरच्या वतीने   संस्कार भारती तुळजापूर शहराध्यक्ष  पद्माकर मोकाशे  व सचिव   सुधीर महामुनी  ,  सावरकर विचारमंचचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 


यावेळी स्वा. सावरकर यांच्या विषयीचे विचार संस्कार भारती अध्यक्ष पद्माकर  मोकशे व  गणेश जळके यानी   सावरकरांचे विचार मांडताना सावरकरांचे विचार तरूणांनी आंगीकारावे असे त्यांनी विचार व्यक्त केले .

यावेळी मंचाचे अध्यक्ष  बाळासाहेब शामराज  तसेच   पत्रकार  अंबादास पोफळे,   जगदिश कुलकर्णी, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष  बिपीन शिंदे. सनातन  संस्थेचे  बगडी  सावरकर विचारमंच उपाध्यक्ष उमेश गवते, कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी, महेश गरड,  सुहास साळुंखे, गिरीश  देवळालकर, शिवाजी डावकरे,  सर्व सावरकर प्रेमी नागरिक  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  महेश कुलकर्णी यांनी तर आभार  बाळासाहेब निकते यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचे पूर्वीपासून देशाला गरज आहे आज ती अधिक प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे नवीन पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य वाचन करून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करून अनुकरन करावे असे आवाहन  बाळासाहेब शामराज यांनी केले.
 
Top