नळदुर्ग, दि.६ : 

 अणदूर ता.तुळजापूर  येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेच्या निषेधार्थ  नळदुर्गवासीया तर्फे शनिवारी  रोजी शहरातील बाजारपेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला. या बंदला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला. 


 प्रांरभी  नळदुर्ग शहरातील  भवानी चौकात  निषेध सभा घेवून पोलीस ठाण्यापर्यत मुक मोर्चा काढण्यात आला. या निषेध सभेस माहिलांची उपस्थिती लक्षणिय होती तर सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत यांना महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

अणदुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचाराचा निषेध करत नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत बस प्रवासदरम्यान घडलेल्या शालेय विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणाचाही यावेळी निषेध करण्यात आला तसेच नळदुर्ग महाविद्यालय, बसस्थानक येथे वावरणा-या टवाळखोरावर कारवाई करण्याची व बसस्थानक येथे कायमस्वरूपी दोन पोलिस शिपाई नेमण्याची मागणी या निषेध सभेप्रसंगी आनेक मान्यवरांनी केली. बंद दरम्यान आत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी चांगला पाठिंबा दिला.
 
Top