वागदरी,दि.६: एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तिनही आरोपींना त्वरित कडक शासन करावे अशी मागणी भटक्या विमुक्त जाती पारधी,आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी निवेदनात करण्यात आली आहे.

  भटक्या विमुक्त जाती पारधी, आदिवासी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाणे येथे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अणदूर येथील बलात्कार प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवून या निंदनीय घटनेतील तिघा आरोपीना अटक करून त्यांना कडक शासन करावे .

     नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दिलेल्या निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा सुनिता पंडित भोसले, महिला कार्यकर्त्या कविता काळे, बेबी दिपक शिंदे संघटनेचे धारस्तंभ पंडित भोसले, आदींच्या सह्या आहेत.
 
Top