तुळजापूर, दि. ६

तुळजापूर नगरपरिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ आरती रणजीत इंगळे यांनी राम मंदिर परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन स्वखर्चाने संपूर्ण परिसरात फ्लेवर ब्लॉक बसवण्याचे काम केल्यामुळे त्यांचे   नागरिकातुन  आभिनंदन  होत आहे.

तुळजापूर येथील आर्य चौक परिसरातील राम मंदिर येथे राहणाऱ्या नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या प्ले वर ब्लॉक अभावी    अस्वच्छता होती. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते रणजित इंगळे यांनी पुढाकार घेतला. या प्रभागाच्या नगरसेविका सौ आरती रणजीत इंगळे यांनी स्वखर्चाने संपूर्ण परिसरामध्ये फ्लेवर ब्लॉक बसवून येथील अस्वच्छता दूर केली आहे.

येथील रहिवासी  ऋषिकांत भोसले यांनी सदर काम नगरसेविका  इंगळे आणि काँग्रेसचे नेते रणजित इंगळे यांनी सदर काम केल्यामुळे या परिसराला शोभा आली आहे आणि येथील स्वच्छता झाली आहे, त्यामुळे  आम्हा सर्वांसाठी समाधानाची बाब आहे ,अशी समाधानकारक प्रतिक्रिया दिली.
 
Top