नळदुर्ग,दि.६:  
अत्याचार करणा-या अणदुर ता. तुळजापूर येथिल आरोपीवर  कठोर  कारवाई  करण्याची  मनसेने मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  साहय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अणदूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली असून,या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींना कठोरातील-कठोर शिक्षा व्हावी,फरार असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी,या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी,हे प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करावे,पीडितेस व त्यांच्या कुटुंबाला सरंक्षण द्यावे, व सदर प्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी व आरोपींना कठोरातील-कठोर शासन व्हावे,असे निवेदनाद्वारे मागणी करून सदर घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नळदुर्ग शहर यानी निषेध नोंदवला आहे, 

यावेळी जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, जनहित कक्ष व विधी विभागाचे  ॲड.मतीन बाडेवाले, 
शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, आवेज इनामदार आदी उपस्थित होते.
 
Top