हन्नुर: नागराज गाढवे 

      अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे श्री बृहन्मठ होटगी संचालित श्री मल्लिकार्जुन प्रशालेत परमपूज्य श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींची 65 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमाय वातावरणात साजरा करण्यात आला. 

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमाकांत गाढवे होते प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी जी यांच्या प्रतिमेचे पूजन  सरपंच उमाकांत गाढवे व श्रीशैल स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर सर यांनी महास्वामीजींच्या कार्याविषयी  माहिती दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी पालक गावातील प्रमुख नागरिक व प्रशालेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक, व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top