उस्मानाबाद,दि. ५ : 
सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणानुसार  २०२२ पर्यंत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आवास योजना  ( ग्रामीण ) आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास व यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना द्वारे ग्रामीण गृह निर्माण क्षेत्रात जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात काम का सुरू आहे . या सर्व आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यास २१ हजार ८८३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले असून १५ हजार ७०४ घरं मंजूर करण्यात आली आहेत . त्यामुळे लाभार्थ्यांना पक्की घरं मिळणार आहेत . अनेकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे .


   त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद अंतर्गत सन २०१६-१७ पासून योजना  निहाय आजपर्यंत  प्रतीक्षा यादीमधील लाभार्थीना  घरकुल  मंजूर करण्यात अली आहेत .

       प्रधान मंत्री आवास योजनेतर्गत  ६६३२ घरांचे उद्दिष्ट होते त्यापैकी ५२७८ लाभार्थ्यांना घरं मंजूर झाली आहेत . रमाई आवास योजनेतर्गत १४४४७ घरांचे उद्दिष्ट होते . त्यापैकी ९७३० घरं मंजूर झाली आहेत . शबरी आवास योजननेतर्गत १९० घरांचे  उद्दिष्ट होते त्यापैकी १७१ घरं  मंजूर झाली आहेत .पारधी आवास योजनेतर्गत  २४७ घरांचे उद्दिष्ट होते .त्यापैकी सर्वंच्या सर्व म्हणजे २४७ घरांना मंजुरी देण्यात आली आहे .  यशवंतराव  चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ३६७ घरांचे उद्दिष्ट होते .त्यापैकी २७८ घरांना मंजुरी देण्यात आली आहे . 

राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृह निर्माण योजनेमधील घरबांधणीची कामं प्रगतीपाठवर आहेत . जिल्ह्यातील लसभार्थ्यांच्या घरांची कामं फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक व्हावीत यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्यात येत आहेत . लाभार्थ्यांना सर्व सुविधांनीयुक्त असे घरकुल उपलब्ध करून देणे आणि भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ अंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक  अनिलकुमार नवाळे  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावर शाखा अभियंता ओ. के सय्यद ,   विस्तार अधिकारी चपलवार ,  मेघराज पवार,  महेश मगर आणि तालुकास्तरावर सर्व गविअ,ग्रामीण गृह निर्माण, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी  प्रयत्नशील आहेत.
                                         
 
Top