इटकळ, दि.५ : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी एस. बी. आय.
ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
इटकळ येथे महेश जळकोटे यांनी एस. बी. आय. अणदूर शाखे अंतर्गत एस. बी. आय. ग्राहक सेवा केंद्र सुरू केले असुन या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन पत्रकार दिनेश सलगरे व केशव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्राहक सेवा केंद्रात अनेक सुविधा उपलब्ध असुन त्या मध्ये नवीन खाते उघडणे ; खात्या वरील रक्कम काढणे ; रक्कम डिपॉझिट करणे ; इतर खात्यावर रक्कम पाठवणे ; लोन हप्ते भरणा करणे ; अटल पेंशन योजना ; प्रधान मंत्री जिवन ज्योती विमा योजना ; ए. टी. एम. मधुन पैसे काढणे ; व सर्व ऑन लाइन सुविधा या ग्राहक सेवा केंद्रात उपलब्ध असल्याचे महेश जळकोटे यांनी सांगितले.या ग्राहक केंद्रा मुळे इटकळ व परिसरातील नागरिकांना यांचा निश्चित च लाभ मिळणार आहे.याग्राहक सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नागनाथ जळकोटे सर , शिवानंद जळकोटे , शिवराज साखरे , श्रीकांत धरणे , प्रकाश स्वामी , नागनाथ स्वामी, मल्लु महाबोले ' मल्लिनाथ जळकोटे , अँड. यशवंत पाटील , सोमनाथ जळकोटे, यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.