नळदुर्ग ,दि.५ : 
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नळदुर्ग शहरवासियाच्यावतीने
    शनिवार दि.६ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग शहर बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

याबाबत गुरूवारी  राञी ९ वाजता नळदुर्ग  येथील मल्लिकार्जून मंदिर  सभागृहात शहरवासीयांची बैठक संपन्न  झाली. या बैठकीमध्ये शनिवार  रोजी शहरातील सर्व  दुकाने बंद ठेवून  सकाळी दहा वाजता भवानी चौकात निषेध सभा घेण्यात येणार आहे.  त्यानंतर पोलीस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक याना  निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगरसेवक शहबाज काझी, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, माजी नगरसेवक संजय बताले, अझहर जहागीरदार, अँड. आरविंद बेडगे, कल्पना गायकवाड, शाहेदाबी सय्यद, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती,  विविध पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी, महिला व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top