उस्मानाबाद , दि . ५ : 

जिल्ह्यातील सामाजिक , संस्कृतिक , ऐतिहासिक , विकासात्मक आणि  प्रशासकीय  या विषयांशी सम्बधित १९८० पूर्वीच्या छायाचित्रांची स्पर्धा घेण्यात येणार असून निवडलेली छायाचित्र जिल्हा नियोजन समितीच्या नव्या वास्तूत , जिल्हाधिकारी कार्यालयात आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवण्यात येणार आहे . या स्पर्धेसाठी आणि जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्मृतींना जतन करण्यासाठी आपल्याकडील छायाचित्र पाठवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  केले आहे.

  या स्पर्धेसाठी पाठवलेल्या  छायाचित्रातून तज्ज्ञमार्फत निवड करून आकर्षक बक्षीसं दिली जाणार आहेत . पुरस्कार , प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे .ही छायाचित्र २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , पहिला मजला , औरंगाबाद रोड  , उस्मानाबाद या पत्यावर पाठवावे.किंवा प्रत्यक्ष आणून देण्याचे आवाहन  दिवेगावकर यांनी केले असून स्पर्धेनंतर निवडक प्रदर्शनही भरवण्याचा मानस आहे .
 
Top