महागाई मुळे सामान्य माणसाचे जीवन त्रस्त
तुळजापूर, दि. ५ :डॉ सतीश महामुनी
पेट्रोलचे दर वाढल्यामुळे महागाई वाढत चालली आहे ,केंद्र सरकारचे याकडे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी त्रस्त बनवत आहे, शिवसेना या महागाईविरोधातील लढा अधिक तीव्र करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देईल असे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी बोलताना सांगितले . माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार आणि शहर प्रमुख सुधीर परमेश्वर या मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजापूरात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तुळजापूर शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि महागाईवर नियंत्रण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार शहर प्रमुख सुधीर कदम उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, उपशहर प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, उपशहर प्रमुख दिनेश रसाळ, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखन परमेश्वर, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख, सिद्धाराम कारभारी शंकर गव्हाणे प्रविण क्षीरसागर, लक्ष्मण माळी, राजकुमार कोडगिरे, बाळासाहेब शिरसट, रामलिंग अस्वले यांच्यासह इतर शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते
तालुका उपप्रमुख रोहित चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका करताना केंद्राने याची दखल घ्यावी अशी मागणी केली. शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम यांनी या प्रसंगी गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली आहे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तू वर झालेला आहे याची दखल ती केंद्राने घेऊन त्वरित महागाई नियंत्रण करावे अशी मागणी केली. युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये महागाई वाढली आहेत कोरोना संकटकाळात अडचणीत सापडलेला माणूस महागाईमुळे जास्त अडचणीत आला आहे त्यामुळे महागाई नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी शिवसेना सातत्याने सामान्य माणसाच्या हितासाठी लढा देत आली आहे केंद्र सरकारने गांभीर्याने पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी त्यामुळे गोरगरीब माणसाला दिलासा मिळेल अन्यथा शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करेल असे सांगितले. सकाळी भगवे पंचे घातलेले शिवसेना नेते आणि शिवसैनिक यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करीत तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.