वागदरी ,दि.१७ एस.के.गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे माझा गाव सुंदर गाव अभियानास प्रारंभ बुधवार (दि17) रोजी  संत गाडगे महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन करून करण्यात आले,

या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुंदर बनवणे, आरोग्य विषयी सुधारणा करणे, प्रर्यावरण व वृक्षसंवर्धन करणे आदी बाबींचा समावेश आहे.

 अभियानाची सुरवातीस ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला असून गावातील सर्व सार्वजानिक ठिकांण रस्ते मंदिर परीसराची स्वच्छता करण्यात येत असून सुंदर गांव बनवण्यासाठी युकांनी पुढाकार घेतला आहे.
 
यावेळी ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे, रविंद्र दबडे, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख, महेश पाटिल,
नागनाथ फडताळे, करबसप्पा कलशेट्टी,विजय पाटिल,हणमंत लांडगे, बालाजी दबडे,आंगणवाडी सेविका शोभाबाई मेंडके,कमल दबडे, भाग्यश्री फडताळे,लक्ष्मी वाघमोडे,
आशा कार्यकर्ते शोभा कोकरे,वर्षा फडताळे यांच्यासहआदि ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top