उस्मानाबाद ,दि.१७: रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद तर्फे पाडोळी येथील गरीब विद्यार्थी राम गायकवाड यास कॅनडा देशात पुढील शिक्षण घेण्यासाठी रूपये २५ हजारांची अर्थिक मदतीचा चेक अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव इंद्रजित आखाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
राम गायकवाड हा पाडोळी यथील पप्पु गायकवाड या गरीब, एक एकर कोरडवाहू माळरान शेती असणा-या शेतक-यांचा मुलगा आहे. माञ अर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बालविकास आश्रम शाळेत इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ९३ टक्के गुण मिळविले तर इयत्ता 12 वी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातुन पुर्ण करून ८३ टक्के गुण घेतले आहे. पुढील शिक्षणासाठी पूणे येथील फर्गुसन काॅलेज मध्ये बी. ए .साठी प्रवेश घेऊन स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली परंतु क्लाससाठी पैसे नसल्याने केटरींगचे काम केले. युनिक ॲकडमीचे मनोहर यांचे मोलाचे सहकार्य लाभले..दरम्यान मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून एम. एस. डब्ल्यु पूर्ण केले. रिलायंन्स फाऊंडेशन मध्ये सहभागी होऊन विदर्भात शेतक-यासाठी दोन वर्ष काम केले. पुढील शिक्षणासाठी कॅनडा यादेशात व्यवसाय व्यवस्थापन या कोर्स साठी निवड झाली आहे.
अशा वेळी उस्मानाबाद रोटरीने अर्थिक मदतीचा हात( २५ हजार) दिला आहे.रोटरीच्या गेट टुगेदर कार्यक्रमात हा धनादेश राम गायकवाड यास देण्यात आला.
या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख,सचिव इंद्रजित आखाडे, नंदकुमार पिंपळे, सुधाकर भोसले, संतोष शेटे,पी आर काळे,सुनिल गर्जे, धनंजय वाकुरे,चित्रसेन राजेनिंबाळकर, कुणाल गांधी, सुरज कदम आदीसह मान्यवर उपस्थित होते.