जळकोट,दि.१० : मेघराज किलजे तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे महसूल मंडळ कार्यालयात सुवर्णजयंती महा राजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत घेण्यात आले.
या फेरफार अदालतमध्ये शेतकरी खातेदार यांना सातबारा ,आठ अ, फेरफार केलेल्या नकलांचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकरी खातेदार यांचे सातबारा व फेरफारसंबंधी तक्रारीचे यावेळी निराकारण करण्यात आले. तसेच फेरफार निकाली काढण्यात आले.
यावेळी जळकोट महसूल मंडळ अधिकारी पी.एस.भोकरे, जळकोट सजाचे तलाठी तात्यासाहेब रुपनवर, अशोक दूधभाते, सुतुरप्पा नळगे, सुधाकर पट्टेवाले, लक्ष्मण सावंत, शफी इनामदार ,शेतकरी खातेदार, ग्रामस्थ उपस्थित होते.