हगलूर ग्रामपंचायत सरपंचपदी ॲड जयपाल पाटील, उपसरपंचपदी महेश गवळी बिनविरोध
नळदुर्ग, दि.१०:
हगलुर ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ॲड जयपाल पाटील तर उपसरपंचपदी महेश गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मंगळवार दि.९ रोजी सरपंच व उपसरपंच निवडणूक अधिकारी म्हणुन एम डी शिंदे , साहय्यक म्हणुन ग्रामसेवक ए.एम.कदम यानी काम पाहिले, यावेळी मनसे नेत्या ॲड रुपालीताई पाटील, ॲड चेतन पाटील, माजी सरपंच नालंदा पाटील, उद्योजक आनंद लाटे, अनंता दराडे, मनोज घुगे, संतोष दराडे, मुबारक सय्यद आदीसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंचासह सदस्यांचा सत्कार ॲड रूपालीताई पाटील व आनंद लाटे यांनी केला.