नळदुर्ग , दि.१० विलास येडगे  सिंदगाव ता. तुळजापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विवेकानंद विठ्ठलराव मेलगिरी यांची तर उपसरपंच पदी जयमाला शिवानंद करंडे यांची निवड करण्यात आली.

सिंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडीसाठी सोमवारी दिनांक ८ रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यलयात विशेष सभा पार पडली या निवडणुकीत सरपंच पदाकरीता विवेकानंद विठ्ठलराव मेलगिरी व गंगाधर पिरप्पा पेठसांगवे यांचा अर्ज दाखल झाल्याने तर उपसरपंच पदासाठी जयमाला शिवानंद करंडे व ललिता बाबुराव चव्हाण यांचा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक घेण्यात आली सरपंच पदासाठी विवेकानंद मेलगिरी यांना ७ मते तर गंगाधर पेठसांगवे यांना २ मते पडली तर उपसरपंच पदासाठी जयमाला करंडे यांना ७ मते तर ललिता चव्हाण यांना २ मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच विवेकानंद विठ्ठलराव मेलगिरी तर उपसरपंच जयमाला शिवानंद करंडे यांची निवड घोषित केली.

 निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. एन. पाळेकर साहाय्यक ग्रामसेवक बी. पी. घुगरे तलाठी जयराज कुलकर्णी यांनी काम पाहिले सरपंच विवेकानंद मेलगिरी उपसरपंच जयमाला करंडे, सुरेश बिराजदार, सुवर्णा गायकवाड, इंदूबाई चिंचोले, लक्ष्मी शिंदे, पुजा कांबळे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. 

यावेळी जयहिंद मेलगिरी, मल्लपा पाटील, श्रीपती ताडकर, ज्ञानेश्वर रेड्डी, सिद्राम परशेट्टी, बलभीम पांढरे संजय बेडजीरगे भोजप्पा परशेट्टी, तानाजी घोडके, म्हाळप्पा सुरवसे, धनंजय बनजगोळे, चंद्रकांत शिंदे, लक्ष्मण शिंदे, जयहिंद वाघमारे, लक्ष्मण पाटील, मधुकर भोसले,दत्तात्रय ताडकर, महादेव बनजगोळे, प्रशांत बनजगोळे, राजेंद्र बनजगोळे, तुकाराम बनजगोळे, संतोष घोडके, हरी वाकळे, नागेश करंडे, लाडुशा शिंदे, राम कांबळे, सुभाष चिंचोले, जयराम येडगे, संजय बनजगोळे, कांत करंडे, चांद नदाफ, बाळु बनजगोळे आदीजन उपस्थित होते.
 
Top