वागदरी , दि.१०,एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायतच्या उपसंरपंचपदी मुक्तताबाई कुंडलिक वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
विद्यामान उपसरपंच दत्ता सुरवसे यानी तांत्रिक आडचणीमुळे आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येते हे पद रिक्त झाले होते. रिक्त झालेल्या येथील उपसरपंच पदासाठी दि.१० फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली.
या निवडणुकीत मुकत्ताबाई वाघमारे यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी के .बी.भांगे व ग्रामसेवक जी.आर.जमादार यांच्या कडे साडे अकरा वाजता दाखल केला .त्यानंतर त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणूक अधिकारी के. बी.भांगे यांनी दुपारी दोन वाजता मुकत्ताबाई वाघमारे याना उपसरपंच म्हणून घोषित केले.
यावेळी खुदावाडी सज्जाचे तलाठी गायकवाड डी. एन. हे उपस्थित होते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते