तुळजापूर, दि. १० :

तुळजापूर तालुक्यातील तीर्थ खुर्द येथे एकादशीच्या निमित्ताने सामूहिक गीत  पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला यानिमित्ताने गीतेच्या अभ्यासक सौ अश्विनी अनंत कोंडो यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तुळजापूर येथील गीता धर्मग्रंथाचे अभ्यासक सौ अश्विनी अनंत कोंडो यांनी एकादशीच्या निमित्ताने सौ सुरेखा जमदाडे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये दुसऱ्या अध्यायातील गीतेचे पठण करून त्याचे निरूपण केले. 

यानिमित्ताने गीतेचे महत्व सांगून तिर्थ खुर्द येथील ग्रामस्थ महिलांना सौ अश्विनी कोंडो यांनी दररोजच्या जीवनातील प्रसंगाचे दाखले देऊन धर्मशास्त्राच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत  सौ संजीवनी प्रयाग ,सौ सुवर्णा चाटुफळे, सौ अश्विनी डोईफोडे, सौ उज्वला गवळी, सौ राजमाने, सौ उमा महामुनी,  सौ मीना मलबा, सौ पाटील, सौ सुवर्णमाला पाटील, सौ आशा गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती. यादरम्यान कार्यक्रमाच्या संयोजक सौ सुरेखा जमदाडे यांनी सौ अश्विनी कोंडो यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. 

तिर्थ खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने गीतापठण च्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
 
Top