नळदुर्ग , दि.१० :

येथिल डॉ आंबेडकर इंटर नँशनल इंग्लीश मेडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मारूती खारवे यांच्या मातोश्री सिताबाई सुदाम खारवे यांचे  अल्पशा अजाराने  वयाच्या ६५ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं,एक मुलगी,सुना,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

 नळदुर्ग येथिल आलियाबाद स्मशानभुमीत बौद्ध धम्म पध्दतीने त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सांयकाळी उशिरा  अंतिम संस्कार करण्यात आले. 

इंदिरानगर येथिल त्यांच्या राहत्या घरातुन मंगळवारी सांयकाळी ७ वाजता अंत्ययाञा निघाली . यावेळी नातेवाईक , विविध पक्षाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते,  नगरसेवक, प्रतिष्ठित  मान्यवर सहभागी झाले होते.

 नळदुर्ग शहर  व परिसरातील अनेक मान्यवरानी   श्रद्धांजली वाहुन खारवे कुंटूबियाचे संत्वन केले आहे.

 
Top