अचलेर,दि.१९: जय गायकवाड
अन्यायाच्या विरोधात हातामध्ये नंगी तलवार उपसून बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहारा तालुक्यातील जेवळी येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा जयंती सोहळा संपन्न करण्यात आला.
यावेळी सरपंच मोहन पणुरे, ग्रामसेवक बिराजदार, बाळासाहेब बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी,राहुल बिराजदार, अमित पाटील,सुरेश दंडगुले, कमलाकर बिराजदार,धनराज बिराजदार, सचिन बिराजदार,नितीन चव्हाण, महादेव बिराजदार यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.