अणदूर,  दि. २३:
 येथिल नूतन सरपंच रामचंद्र आलूरे यांचा  ब्रम्हवृंद संचलित श्री सत्यप्रमोद तीर्थ मधव मंडळच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अणदूर ता. तुळजापूर  येथिल ग्रामपंचायतीचे नुतन  सरपंच रामचंद्र आलूरे यांच्या  निवडीमुळे मंडळाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना मंडळाचे सचिव गोपाळ कुलकर्णी म्हणाले की, सर्वात जुनी ही ब्राम्हण समाजाची संस्था असून समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक या संस्थेमार्फत चांगल्या पद्धतीने होते, गावच्या प्रथम नागरिक म्हणून रामचंद्र आलूरे यांची निवड ही सार्थ गोष्ट  असून संस्थेला याचा अभिमान असल्याचे सांगितले.

 यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल अणदूरकर, मंगेश अणदूरकर,राजेश देवसिंगकर, अजय अणदूरकर,गणेश देवसिंगकर,बालाजी कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी,वैभव उपळेकर, ऋषी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते
 
Top