ताज्या घडामोडी


तुळजापूर, दि. २२ 

तुळजापूर येथील समाजिक कार्यकर्ते  पंकज शहाणे यांनी आपल्या मातोश्रीच्या निवृत्ती वेतनामधील   २५  हजार रुपये खर्चून तुळजापूर ते नळदुर्ग वाहणाऱ्या बोरी नदीच्या पात्राला रुंद करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचे जनतेमधून उत्स्फूर्त स्वा
 या अभियानामध्ये समाजाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुळजापूर पासून सुरू होणारी बोरी नदी नळदुर्ग मार्गे पुढे वाहते, भुईकोट किल्ल्यातील  प्रसिद्ध असणारा नर - मादी धबधबा याच नदीवर आहे. 
समाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे यांनी गेल्या काही दिवसापासून जेसीबी मशिनच्या साह्याने खोली वाढवून पात्र मोठे करण्याचे काम सुरू केले आहे. कायम दुष्काळी भाग असणाऱ्या भागासाठी बोरी नदीचे पात्र संजीविनी असून ते पात्र मोठे केले तर उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याला आणि शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांना याचा लाभ होऊ शकतो. 

तुळजापूर येथील   प्रा. कै. शंकराव शहाणे यांच्या निधनानंतर पंकज यांच्या मातोश्रींना शासनाच्या वतीने पेन्शन मिळते. या पेन्शन मधील 25 हजार रुपये त्यांनी आपल्या मुलाला समाजकार्यासाठी सहा दिवसांपूर्वी दिले होते. या सात दिवसांमध्ये पंकज शहाणे यांनी बोरी नदीच्या पात्रातील बाराशे  मीटर अंतराचे खोलीकरणाचे काम पूर्ण केले असून उर्वरित कामासाठी त्यांनी समाजातून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
Top