तुळजापूर, दि. २२ : 

२०१८ पासून तुळजापूर नगर परिषदेवर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पुरुष नगराध्यक्ष काम पाहत आहेत. प्रत्यक्षात येथील आरक्षण महिला म्हणून आहे. त्यामुळे तात्काळ महिला नगराध्यक्ष करण्यासाठी प्रशासनास आदेश द्यावेत अशी मागणी तुळजापूर नगर परिषदांमधील काँग्रेस व शेकाप नगरसेवकांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे.


काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमर मगर,  सुनील रोचकरी, सौ.आरती रणजीत इंगळे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक राहुल खपले यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी तुळजापूर शहराचे नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहेत मात्र पुरुष उपनगराध्यक्ष असणाऱ्या नगरसेवकाकडे २०१८ पासून शहराचे नगराध्यक्षपद प्रभारी पदभार देऊन चालवले जात आहेत, राज्य शासनाच्या दि.  ९  ऑक्टोबर २०२० परिपत्रकाच्या अगदी उलट कारभार केला जात आहे. यापूर्वी पालिकेवर २२ ऑगस्ट पत्रावरून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांनी याप्रश्नी नगराध्यक्षपद महिलांना नगरसेविकांना देण्याची मागणी स्तरावर करण्यात आली आहे.

यासंदर्भात सत्ताधारी पूर्वीचे राष्ट्रवादी व आताचे भाजपा नगरसेवक विशेषतः प्रभारी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या कार्यकाळात त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली आहे.
 
Top