तुळजापूर, दि.२२,डाँ. सतिश महामुनी

तुळजापूर मध्ये येणाऱ्या भाविकांना कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी भाविकांची संख्या कमी करून मंदिर परिसरात दिवसभर फवारणी केली जात आहे तहसीलदार सौदागर तांदळे व जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्या माध्यमातून दिवसभर मंदिर परिसरात देखरेख केली जात आहे

राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांची संख्या 10,000 करण्यात आली असून सोशल डिस्टन्स व मास्क याचे काटेकोर बंधन पाळले जात आहे मंदिर परिसराची निगडीत घटकांना कोरोना ची लागण झाल्यामुळे युद्धपातळीवर उपाययोजना आणि खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे वेगवेगळ्या वेळा निश्चित करून प्रशासनाकडून भाविकांना संरक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न ची पराकाष्ठा केली जात आहे मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता फवारणी त्याचबरोबर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जात असल्याचे दिसून आले.



ऑनलाइन पद्धतीने प्रवेश पास मिळणे सुरु असून ऑफलाईन पद्धतीने दहा हजार भाविकांना प्रवेश पास दिले जात आहेत. मर्यादित संख्येने भाविकांनी गर्दी न करता नियमांचे पालन करीत दर्शन करावे असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे व  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे
 
Top