जळकोट,दि.२१:मेघराज किलजे समर्थ क्लास मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी क्लासचे संस्कार पुढे नेऊन , शिक्षण घेऊन समर्थ क्लासचे नाव उज्वल करावे. असे प्रतिपादन अणदुर येथील जवाहर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या अनिता मुदकण्णा यांनी जळकोट ता.तुळजापूर येथे केले.
जळकोट येथील समर्थ क्लासच्या यावर्षीच्या दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरात व निरोप समारंभ कार्यक्रमात अनिता मूदकण्णा ह्या बोलत होत्या. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त समर्थ क्लासच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. समर्थ क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेली संस्काराची शिदोरी आपल्या भावी आयुष्यात वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या संस्कार शिदोरीच्या बळावर आपले भावी शिक्षण घेऊन समर्थ क्लासचे नाव उज्वल करावे. असे अनिता मूदकण्णा यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सिद्धारूढ जळकोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संतोष चव्हाण, प्रा. मल्लिनाथ बिराजदार व समर्थ क्लासचे संचालक रामशेट्टी पाटील हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात क्लासचे विद्यार्थी कु. समर्थ कोळगे, पवन कदम, प्रफुल्ल बुराणपुरे,कु.पलक मंटगे, गौरी टोपे, स्नेहा माने, गायत्री गंगणे, अंबिका पात्रे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजलक्ष्मी किलजे व कु. वैष्णवी कागे यांनी केले. आभार क्लासचे संचालक रामशेट्टी पाटील यांनी मानले.