उस्मानाबाद, दि.२२ 
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार समाजाला प्रेरक आहेत. त्यांच्या विचारांवर चालणारा व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी ठरत नाही. यामुळे त्यांचे विचार घेवूनच समाजाने मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे मत खासदार छञपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ते उपळा येथे आयोजित शिक्षणमहर्षी स्व.भाई लिंबराज श्रीपतराव पडवळ या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्यासाठी आले होते.


यावेळी खासदार छत्रपती संभाजी महाराज माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खा.ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सुरेश देशमुख, सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, संभाजीराव पंडीत, राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील, चंदशेन देशमुख,रोहीत पडवळ, शिंगोलाचे सरपंच येडबा शितोळे, उपळा सरपंच सुवर्णा पडवळ, जि.प.सदस्य बाबुराव चव्हाण, गेवराईचे प्रतापसिंह पंडीत आदींची उपस्थिती होती.

बोलताना पुढे ते म्हणाले की, स्व.बापूंवर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा होता. त्यांच्या विचारांवर चालूनच बापूंनी अखंडपणे विद्यार्थी आणि मागासवर्गियांसाठी योगदान दिले. असे गौरवोद्दार काढले.
यावेळी मधूकरराव चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, बापूंनी सामाजिक कार्यासाठी आयुष्य झोकून दिले होते. आजच्या तरुण पिढीने बापूंसारखे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चौधरी यांनी केले तर आभार प्रा.राजाभाऊ पडवळ यांनी मानले.


 
Top